मुंबई: महाराष्ट्राच्या राजभवनातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. राज्यपालांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील प्राप्त झाला असून अहवाल निगेटिव्ह आले आहे. राज्यपाल यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. माझी प्रकृती ठणठणीत असून खबरदारी म्हणून चाचणी करून घेतली, ती निगेटिव्ह आली आहे. कोरोनाची लक्षणे माझ्यात नाही असे राज्यपाल यांनी सांगितले आहे.
आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो.
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 12, 2020
राजभवनावरील कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु असून ते लवकर बरे होतील असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला आहे.