नवापुर। नंदुरबार जिल्हात आज पेसा कायदा अंमलबजावणीसाठी राज्यपालाचे उपसचिव परिमल सिंह आले होते. त्यांनी नवापुर तालुक्यातील पेसा कायदा अंतर्गत भरडु मासेमारी तलावाची पहाणी करुन मार्गदर्शन केले. त्यांनी नवापुर तालुक्यातील शेवटचे टोक असलेले खेकडा गावातील मच्छी तलावाची पहाणी केली. त्यांचा सोबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी निमा अरोरा या होत्या.
पेसा कायद्याची प्रभावी अमलबजावणी झाल्यास आदिवासी समाजाचा विकास होण्यास मदत
यावेळी त्यांचा सत्कार तहसिलदार प्रमोद वसावे, पंचायत समिती सभापती सविता गावीत, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, खेकडा गावाचा सपंच अंजना मावची, उपसपंच माधव गावीत यांनी शाल श्रीफळ देऊन केला. या नंतर ग्रामस्थ यांचाशी चर्चा परिमल सिंह यांनी करताना सांगितले की, पेसा 5 टक्क वे मानव विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत उत्पन्न वाढीसाठी गौण वनौपज सारक उपक्रम सुरु करावे त्याचबरोबर वनात झाडाची पुनरलागवड करावी या योजनेचा लाभा घ्यावा यांची प्रभावी अंमलबजावणी करावी व योजनेचा फायदा घेऊन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवा. पेसा कायद्याची प्रभावी अमलबजावणी झाल्यास आदिवासी समाजाचा विकास होण्यास मदत होईल या नंतर ग्रामस्थानी आपली समस्या मांडली यावेळी मच्छी अधिकारी पाडवी, विस्तार अधिकारी किरण गावीत, दिलीप कुंवर, तालुका पेसा समन्वय विजय ठाणकर, वनहक्क व्यवस्थापक प्रकाश गावीत, शिरीष मावची, ग्रामसेवक सुनिल वळवी, परमेशवर गंडे, समाधान पाटील आदी उपस्थित होते.