मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अधिकच मोठा झाला आहे. काल शिवेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. मात्र वेळेत राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या पाठींब्याचा पत्र मिळाले नसल्याने शिवेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आले नाही. शिवसेनेने राज्यपालांकडून वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी ती नाकारली आणि तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला निमंत्रित केले. दरम्यान आता राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. कायदेविषयक बाबींची चाचपणी सुरु असून त्यानंतर शिवसेना राज्यपालांविरोधात कोर्टांत जाण्याची शक्यता आहे.
राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी ४८ तासांची मुदत दिली होती, मात्र शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली होती. त्यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील राज्यपालांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली होती.
राष्ट्रवादीला देखील २४ तासांची वेळ देण्यात आली आहे.