मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच चर्चा सुरु आहे. दरम्यान राज्यपालांच्या निर्णयावर शंका उपस्थित होत असून राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना कोणालाही काही माहित नसताना रात्रीतून कधी राष्ट्रपती राजवट उठविली गेली यावर शिवसेनेने शंका उपस्थित केले आहे. सकाळी राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी कधी प्रस्ताव पाठविला गेला? कधी यावर निर्णय घेण्यात आला असे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.