मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार होत आहे. या मंत्रीमंडळात २५ कॅबिनेट, १० राज्यमंत्री आज शपथ घेणार आहे. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी शपथ घेताना मंत्र्यांनी शपथ पत्राव्यतिरिक्त महापुरुष आणि वंदनीय पुरुषाची नावे घेतली. त्यावेळी राज्यपाल शपथ घेणाऱ्या मंत्र्यांवर चिडले. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवाचे आमदार कॉंग्रेसनेते के.सी.पाडवी यांनी शपथविधीनंतर स्वत:चा मजकूर वाचला. त्यावर राज्यपाल भडकले आणि त्यांना पुन्हा एकदा शपथ घ्यायला लावली.
जे शपथपत्रात आहे, त्याचाच उल्लेख करा, अतिरिक्त कशाला बोलतात अशा शब्दात राज्यपालांनी राग व्यक्त केला. कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी थेट शपथ न घेता सुरुवातीला काही नावे घेतली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील शपथ घेतल्यानंतर काही वंदनीय पुरुषांची नावे घेतली यावर राज्यपालांनी आक्षेप घेतले.