मुंबई: विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांची नियुक्ती रखडली आहे. उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यात १२ जणांची नावे फायनल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ मंजुरीनंतर १२ जणांची यादी राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे.
यात राष्ट्रवादीकडून एकनाथराव खडसे, शेतकरी नेते राजू शेट्टी, शिवसेनेकडून आदेश बांदेकर, शिवाजी आढळराव पाटील, कॉंग्रेसकडून सत्यजित तांबे, सचिन सावंत यांची नावे चर्चेत आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब होईल. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.