राज्यपाल नियुक्त आमदार: खडसेंसह चंद्रकांत रघुवंशी यांची शिफारस

0

जळगाव: राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी १२ जणांच्या नावांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली. १२ सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन यादी सुपूर्द केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथराव खडसे यांना संधी देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. नंदूरबाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेनेकडून संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटीलमु, जफ्फर हुसैन, अनिरुद्ध वणगे यांचे नाव असल्याचे बोललेजात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे

यांचे नाव आहे.