मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासोबतच त्यांच्यावर आता गोव्याची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयची जबाबदारी देण्यात आल्याने गोव्याची जबाबदारी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली आहे.
१४ ऑक्टोंबर २०१९ ला सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते.