‘मला हिंदुत्त्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही’; राज्यपाल- मुख्यमंत्र्यांमध्ये पुन्हा वाद

0

मुंबई: राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद सुरुवातीपासूनच आहे. दरम्यान पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात वाद पेटला आहे. राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. यात त्यांनी मंदिरे उघडी करण्याची मागणी केली असून उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्राद्वारेच उत्तर दिले आहे. ‘माझ्या हिंदुत्त्वाला प्रमाणपत्राची गरज नाही. तुमच्या प्रमाणपत्राची तर नक्कीच नाही. मुंबईला पाक-व्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांसोबत हसणाऱ्यांची यावर बोलू नये असे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

कोरोनामुळे धार्मिक स्थळे तसेच सर्वच बंद होते. मात्र अनलॉकच्या प्रक्रीयेच्या माध्यमातून हळूहळू सर्व दुकाने, हॉटेल्स उघडी करण्यात येत आहे. मात्र मंदिर उघडी करण्याबाबत अद्यापही राज्य सरकारने कोणतेही निर्णय घेतलेले नाही. दरम्यान आज मंगळवारी भाजपचे राज्यभर मंदिरे उघडी करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिली आहे. राज्यातील बार-रेस्टॉरंट सुरु झाले मग मंदिरे का नाही सुरु केली.? तुमचे हिंदुत्व कोठे गेले?, आपण धर्मनिरपेक्ष झाला आहात का? असा प्रश्न राज्यपालांनी केला आहे.