जळगाव प्रतिनिधी । राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आज सकाळी ८.४५ वा. येथील विमानतळावर विमानाने आगमन झाले. त्यांच्याहस्ते विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आदिंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पोलीस बॅन्ड पथकाने सलामी दिली. यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील, महापौर ललीत कोल्हे, अशोक जैन यांनी स्वागत केले.