कामगार नेते अरुण दामोदर यांचा भुसावळातील पत्रपरीषदेत आरोप
भुसावळ- महानिर्मितीचे वीज संच बंद ठेवून सध्या खाजगी कंपन्यांतून होणार्या वीजनिर्मितीला चालना दिली जात असून आगामी काळात तर राज्यभरातील 210 मेगावॅटचे वीजनिर्मिती संच बंद करण्याचा डाव प्रशासनाने योजल्याचा खळजनक आरोप कामगार नेते अरुण दामोदर यांनी येथे केला. मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकार परीषद घेतली.
सुस्थितीतील वीज केंद्र होताय बंद
अरुण दामोदर म्हणाले की, महानिर्मितीने नवीन प्रास्तावित संच कार्यान्वित केल्याशिवाय जूने संच बंद करण्यास आमचा विरोध राहणार आहे. खाजगी कंपन्यांच्या छुप्या आदेशाने सुस्थितीमधील वीज केंद्र बंद ठेवली जात आहेत, तर काही ठिकाणी एमओडीचे कारण पुढे केले जात आहे. व्यवस्थापनास रेट कमी करण्यासाठी कामगार संघटनांनी अंतर्गत सुधारणा व धोरण ठरविण्याबाबत अनेक मुद्दे सूचवले होते. हे मुद्दे सरकारलाही देण्यात आले आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी कामगार नेते अरुण दामोदर, भरत पाटील, कैलास झोपे आदींसह यावेळी उस्मान पठाण, रामा धांडे, पांडूरंग तळेले, विजय तावडे, नीलेश कोळी, सुनील राजपूत, निलेश वाघ, अनिकेत नवले आदी उपस्थित होते.
दीपनगरात राजकीय हस्तक्षेप
दीपनगर प्रकल्पात स्थानिक व तालुक्यातील सत्ताधार्यांनी दबाव आणल्याने अधिकार्यांना काम करणेही कठीण झाले असून या प्रकाराला अधिकारी वैतागल्याचे राष्ट्रवादी ट्रेड युनियनने काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले. कुणाचेही नाव मात्र त्यांनी घेतले नाही. दीपनगरात अडीच ते तीन लाखांपर्यंतच्या निधीतून इन्कॉयरी स्वरुपात काम छोट्या पुरवठादार किंवा ठेकेदारांना दिले जाते तात्र या कामातही मोठे ठेकेदार खोडा घालून स्वत:च इन्कॉयरी मिळवित असल्याचा आरोप करण्यात आला.