पिंपळनेर : येथील क्षत्रीय अहिर सुवर्णकार समाजाच्यावतीने दांमडकेश्वर लॉन्स येथे 75 जोडप्यांचे सामुहिक गंगा पूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमासाठी प.पु. आचार्य महामंडलेेश्वर जनार्दन हरिजी महाराज, प.पु. गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर, विंध्यवासींनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पारंपारिक वाद्यांच्या गजरात सजीव देखावे
चारधाम करून आलेल्या भाविकांना एकत्र आणून सामूहिक गंगा पूजनाचा कार्यक्रम व्हावा, यासाठी दासानुदास संतचरण शेखर, गजानन वानखेडे यांच्या संकल्पणेतून हा गंगा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या गंगा पूजनासाठी धुळे, जळगाव, पुणे, नगर, मुंबई, कल्याण, डोंबिवली, अकोला, उस्मानाबाद आदी ठिकाणाहून 75 जोडपे व त्यांचे नातेवाई उपस्थित होते. चारधाम करून आलेल्या भाविकांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. डोक्यावर कळशी घेत महिलांनी ठेका घेतला. पारंपरिक वाद्य वाजवीत देवी देवता यांचा सजीव देखावा दाखविण्यात आला होता. भव्य होम हवन होत सर्वांनी गंगा पूजन केले. भाविकांनी भव्य अश्या गंगा पूजनाचा लाभ घेतला. यावेळी विष्णूकांत जडे, देवीदास दंडगव्हाळ, रामदास अहिरराव, ह.भ.प. भालचंद्र शंकर दुसाने व धनराज देवीदास विसपुते यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.