राज्यभरात शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली

0

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यभरात शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

ठाण्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असणाऱ्या पोलीस शहिद स्मारक येथे आज ठाण्याच्या पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पोलीस शहिद जवानांना सलामी देण्यात आली.

रायगड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शहिद स्मारकास आज सकाळी रायगड चे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पोलीस शहिद जवानांना सलामी देण्यात आली. यावेळी रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर आदी उपस्थित होते.