राज्यमंत्री दिलीप कांबळेंच्या वक्तव्याचा मुक्ताईनगरात निषेध

0

भारीपा बहुजन महासंघाचे पोलिस निरीक्षकांना निवेदन

मुक्ताईनगर- बाळासाहेब आंबेडकर यांचे नक्षलवाद्याशी संबंध असल्याचे विधान करणार्‍या राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा मुक्ताईनगरात भारीप बहुजन महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी निषेध करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अहमदनगरच्या प्रचार सभेत केलेला आरोप धादांत खोटा असून दिशाभुल करणारे व समाजात संभ्रम निर्माण करणारे त्यांनी विधान केल्याचा भारीप बहुजन महासंघाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. मंत्र्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली असून दखल न घेतल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसगी तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर, जिल्हा मार्गदर्शक विश्वनाथ मोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा संघटक शुभम आसलकर, युवा तालुकाध्यक्ष संजय धुंदले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष राजश्री ससाने, तालुका उपाध्यक्ष दिलीप पोहेकर, शहराध्यक्ष सुमित बोदडे, तालुका मार्गदर्शक एस.टी.हिरोळे, युवक मार्गदर्शक संजय म्हसाने आदींची उपस्थिती होती.