राज्यमंत्री मंडळ यादीला आज पूर्णविराम, कुणाचा लागेल नंबर?

मुंबई  : राज्य मंत्रिमडळाचा विस्तार कधी ? या प्रश्नाला आज पूर्णविराम मिळेल अशी शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची यादी आज मुंबईत येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दिल्लीचे खास दुत आज मुंबईत दाखल होतील. शिंदे – भाजप सरकार स्थापन होऊन दोन आठवडे झालेत. तरी देखील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.  यामुळे सरकार बाबत टीकेचा सूर निघतोय. मंत्रिमडळाचा विस्तार कधी ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, राषट्रपतीपदाची निवडणूक, सर्वोच्च नायायालयाची याचिका अशा विविध कायास लावले जात आहेत.  राष्ट्रवादी पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे हे मतदान संपल की मंत्रिमंडळाची यादी  दिल्ली हून येणे अपेक्षित आहे. दिल्लीतील खास दुत आज संध्यााळपर्यंत मुंबईत दाखल होतील.  दिल्लीतील दुत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करतील.  दिल्लीहून आलेल्या यादीत किमान २५ जणांना मंत्रिमंडळ मध्ये स्थान दिले जाईल अशी शक्यता आहे. ही आज केवळ मंत्रिमंडळात कोणाला मंत्रिपद दिलं जाईल याची यादी दिली जाणार आहे, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री कोण असेल यावर शिक्काोर्तब होईल. पण कुणाला काय खातेवाटप करायचा हा निर्णय मंत्रिमंडळ शपथविधी नंतर दिलं जाईल अशी माहिती समोर येत आहे.