मुक्ताईनगर : नगरपालिका निवडणूका आटोपल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा धुराळा उडणार असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, भुसावळ या तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या सर्व गटांसाठी व पंचायत समितीच्या सर्व गणांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मॅराथान मुलाखती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ताईनगर येथे घेण्यात आल्या. दरम्यान यावेळी एकूण 500 उमेदवारांनी मुलाखती दिल्या तर शेकडो इच्छुकांनी मुलाखतीसाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती. शिवसेने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी जोर लावला असून त्यादृष्टीने ठिकठिकाणी शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेना शाखेसह कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
निवडून येण्याची क्षमता असणा
मुक्ताईनगर येथील शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा परिषद गटासाठी रावेर लोकसभा मतदार संघातील एकूण 33 जागांसाठी 169 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. तर पंचायत समिती गणांच्या 66 जागांसाठी 331 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. अशाप्रकारे तब्बल 500 उमेदवारांच्या मुलाखती नामदार गुलाबराव पाटील यांनी घेतल्या, या इच्छूकांचे कार्य तसेच निवडून येण्याची क्षमता लक्षात घेवून त्यांना निवडणूकीत शिवसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी मुक्ताईनगर येथे झालेल्या बैठकीत चोपड्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख इदिरा पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, मुन्ना पाटील यांसह सर्व तालुका प्रमुख उपस्थितीत होते. तत्पुर्वी मुक्ताईनगर शहराच्या प्रवर्तन चौकातील शाहु-फुले-आंबडकरांच्या अर्धाकृती पुतळ्यांना माल्यार्पण करुन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. मुलाखत कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका प्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख सुनील पाटील, अफसर खान यांनी परिश्रम घेतले.
कुर्हा काकोड्यात सभा
तालुक्यात केवळ 20 वर्षापासून मते मागितली मात्र कामे केली नाहीत. त्यामुळे आता पुढील आमदार चंद्रकांत पाटील यांना केल्याशिवाय जनता राहणार नाही. पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद 2 वर्ष चांगल्या खात्याचे मंत्री तरी सुध्दा कुर्हा भागात कामे नाही. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. सुत्रसंचालन व आभार पंकज पांडव यांनी मानले