राज्यमार्ग हस्तांतरण करण्याचा विषय नामंजूर

0

यावल। शहरातील मद्यविक्रीच्या दुकानांना संजीवनी देण्यासाठी अंकलेश्वर- बर्‍हाणपूर राज्यमार्ग पालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा विषय, विशेष सभेत अपेक्षेप्रमाणे सर्वानुमते नामंजूर झाला. तर पंतप्रधान आवास योजनेच्या आराखड्याच्या समितीसह तब्बल 39 विषयांवर चर्चा करण्यात आली. पालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभागृहात मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्यासमोर रमाकांत मोरे यांनी विषयांचे वाचन केले. हस्तांतरणाचा विषय पटलावर येताच नगरसेवक अतुल पाटील यांनी महत्वपूर्ण मुद्दा मांडला.

पंतप्रधान आवास योजनेचे सर्वेक्षण करणार
विनाकारण पालिकेवर आर्थिक बोजा आल्याने पालिकेला अवमान याचिकेचा सामना करावा लागला असता, असे स्पष्टीकरण नगरसेवक पाटील यांनी दिले. याय मुद्याला सभागृहाचा पाठिंबा मिळाला. चर्चेदरम्यान पालिकेच्या सभागृहातील वातावरण काहीवेळ तापले पंतप्रधान आवास योजनेत संबधित एजन्सी सर्वे करून राज्य केंद्र शासनाकडे आराखडा सादर करेल. तसेच त्यांना देयक अदा करण्यासंबंधी समिती निर्णय घेईल. समितीत नगराध्यक्ष सुरेखा कोळी, नगरसेवक सुधाकर धनगर, प्रा. मुकेश येवले, शेख असलम रजीयाबी गुलाम रसूल यांची निवड करण्यात आली.

नगरसेवक अतुल पाटील यांच्या मुद्याला दीपक बेहेडेंचे समर्थन
रस्ता हस्तांतरीत केल्यामुळे त्यावर होणारा खर्च पालिकेला झेपणारा आहे. त्यामुळे हा विषय सर्वानुमते नामंजूर करण्यात यावा असे त्यांनी सांगितले. त्यावर नगगरसेवक दीपक बेहेडे यांनी समर्थन दिले. तर नगरसेविका नौशाद मुबारक तडवी यांनी देखील रस्ता हस्तांतरणाच्या विषयाला विरोध दर्शवला. रस्ता हस्तांतरणाचा विषय मंजूर झाला असता तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरला असता.