भुसावळ । राज्य सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करत शेतकर्यांना अटी, शर्तीच्या फेर्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्ती तसेच शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी 26 रोजी राज्यव्यापी परीषद आयोजित करण्यात आली असून यास तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासंदर्भात विविध संघटनांतर्फे पिंप्रीसेकम येथे बैठक घेण्यात आली. प्रसंगी राज्य सुकाणू समितीच्या प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, बहुजन मुक्तीचे मुकुंद सपकाळे यांसह संघर्ष समितीचे रमाकांत पाटील, लोकसंघर्ष मोर्चाचे चंद्रकांत पाटील, हमाल मापाडीचे मौलाना अजगरअली, अशोक तायडे, संजय पाटील, साकेगाव प्रभारी सरपंच शकिल पटेल, शाम फुलगावकर, उज्वला चौधरी यांची उपस्थिती होती.