राज्यसभा निवडणूक: शिवसेनेने ज्येष्ठांना डावलले; प्रियंका चतुर्वेदीला उमेदवारी

0

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. भाजपच्या कोट्यातून तीन उमेदवार देण्यात आले आहे. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले आणि डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेने वर्षभरापूर्वी कॉंग्रेस सोडून सेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेने पुन्हा निष्ठावंतांना डावलले आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावते यांचे नाव चर्चेत होती. मात्र शिवसेना नेतृत्त्वाने चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली.

प्रियांका चतुर्वेदी या मंत्री आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय मानल्या जातात. आदित्य यांच्या निकटवर्तीय असल्याने राज्यसभेच्या शर्यतीत चतुर्वेदी यांचे पारडे जड मानले जात होते.