नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी राज्यसभा निवडणूक स्थगित करण्यात आली होती. राज्यसभेच्या ५५ जागांसाठी ही निवडणूक होणार होती. त्यापैकी ३७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान बिनविरोध निवड झालेल्या राजसभा सदस्यांना आज शपथ देण्यात आली. राज्यसभा अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी नवनियुक्त सदस्यांना शपथ दिली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीकडून स्वत: अध्यक्ष शरद पवार, भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोंसले, भागवत कराड, शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी, कॉंग्रेसचे राजीव सातव यांनी शपथ घेतली. फौजिया खान यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या शपथविधीला उपस्थित राहू शकल्या नाही.
I was sworn in as a Member of the Rajya Sabha from Maharashtra today. I will do my utmost to uphold the dignity of this august house and discharge my duties as representative of the people.#RajyaSabha @MVenkaiahNaidu pic.twitter.com/n539NzwMJZ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 22, 2020
शरद पवार यांनी हिंदीत, रामदास आठवले, उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीत तर प्रियांका चतुर्वेदी, राजीव सातव, भागवत कराड यांनी मराठीतून शपथ घेतली. देशभरातील ३७ सदस्यांनी यावेळी शपथ घेतली.
Today taking a oath of member of rajya sabha in parliment. pic.twitter.com/GdQwWzhJ8l
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 22, 2020