राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील 7 जागा !

0

नवी दिल्ली : देशभारतील राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 26 मार्चला मतदान होणार आहे. 26 तारखेलाच संध्याकाळी पाच वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांचा यात समावेश आहे. 17 राज्यांतून 55 सदस्य राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.

राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील 55 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने राजकारण बदलले आहे. येत्या राज्यसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. त्यामुळे 7 पैकी 5 जागा महाविकास आघाडीकडे राहिण्याची शक्यता आहे. भाजपचे 2 उमेदवार निवडून येतील.

राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. शरद पवार वगळता या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यायचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.