भुसावळ : राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे तसेच धनंजय महाडीक निवडून आल्यानंतर भुसावळातील भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ फटाक्यांची आतषबाजी करून तसेच लाडू वाटप करून पदाधिकार्यांनी जल्लोष केला. यावेळी महिला पदाधिकार्यांनी फुगड्याही खेळल्या. भाजपाच्या विजयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्यानंतर परीसर दणाणला.
तीन खासदारांनी मिळवला विजय
राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार निवडून येण्याची शक्यता होती मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य वरीष्ठ नेत्यांच्या कुशल खेळीमुळे भाजपाचे तीन खासदार दणदणीत मते मिळवून विजयी झाल्याने भुसावळातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पूर्ण ताकतीने लढवून भारतीय जनता पार्टी आपला झेंडा भुसावळ नगरपालिकेवर पुन्हा फडकविण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल, असा आशावादही यावेळी पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, प्रा.दिनेश राठी, राजेंद्र आवटे, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, अजय नागराणी, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, खुशाल जोशी, गिरीश पाटील, किरण सरोदे, नारायण रणधीर, जयंत माहुरकर, सदाशीव पाटील, राजू खरारे, शिशिर जावळे, अनिल पाटील, चंद्रशेखर पाटील, विशाल जंगले, प्रवीण इखनकर, प्रशांत देवकर, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, ओबीसी मोर्चाचे भावेश चौधरी, चेतन बोरोले, किरण मिस्त्री, राहुल तायडे, शेखर धांडे, प्रा.विलास अवचार, संजय बोचरे, भरत पटेल, व्यापारी आघाडीचे सागर चौधरी, योगेश चौधरी, संतोष ठोकळ, नंदकिशोर बडगुजर, चेतन सावकारे, लखन रणधीर, हर्षल पाटील, लोकेश जोशी, सागर जाधव आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.