जळगाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा जळगाव शहरातील ३२ उपकेंद्रांवर २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फक्त परीक्षार्थींना प्रवेश राहील, असे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.
पेपर सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी शहरातील ३२ उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणीही प्रवेश करू नये. हे आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी ८ वाजेपासून ते पेपर रवाना होईपर्यंत प्रत्येक उपकेंद्रावर ३ पुरुष व २ महिला पोलिस कर्मचारी बंदोबस्त तैनात करावा. परीक्षा केंद्राजवळच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनिक्षेपक हे पेपर सुरू असलेल्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असेही आदेश दिले आहेत.
—————————————–