भुसावळ । औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेत वरणगाव येथील 28 विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावून प्रथम क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा 27 रोजी औरंगाबाद येथे पार पडली. स्पर्धेत राज्यभरातील विविध शाळेतून आलेले एकूण 523 विद्यार्थी सहभागी झाले होते. वरणगाव शहरातून 72 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
ज्युनिअर गटात- स्वरुपा पाटील (चॅम्पियन), वेदांत इंगळे व ऐश्वर्य तळेले (प्रथम), कार्तिक चव्हाण (द्वितीय), संदीप चौधरी (तृतीय), सिनीअर गटात राहूल सोनार (चॅम्पियन), गौरी पाटील (प्रथम), सानिका सुतार (द्वितीय), लेव्हल एन. सी. – खुशी सोनार व भावेश नारखेडे (चॅम्पियन), पार्थ बाळापूरकर, वैष्णवी लोखंडे, धीरेंद्र पाटील, तेजस भंगाळे (प्रथम), शंतनूर बोरसे, जयसिंग पाटील (द्वितीय), अक्षरा पाचपोळ (तृतीय). लेव्हल 1 – केतन बोंडे (चँपीअन), मयुर भालेराव (प्रथम), लेव्हल 2 – सार्थक वाघमारे व अनुष्का भंगाळे (चॅम्पियन), अथर्व मुतडक, चिन्मय बाळापूरकर (प्रथम), आदित्य सोनार (द्वितीय), लेव्हल 3 – हिमांशू भंगाळे व कार्तीक थोरात (चॅम्पियन), नकुल सोनार (प्रथम), तनिष्क झोपे (द्वितीय) विजयी झाले त्यांना चेअरमन राहूल सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.
आंतरशालेय स्पर्धेतील विजेते
आंतरशालेय स्पर्धेत चाटे स्कुलच्या 12 विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकाविली. त्यात इयत्ता 1लीचा राहूल सोनार (प्रथम), सुयश इंगळे (द्वितीय), गोकर्णी पाटील (तृतीय), इयत्ता 2 री – अश्लेषा पंकज देशमुख (प्रथम), गिरीष हरीदास राजपूत (द्वितीय), नंदिनी पंकज भंगाळे (तृतीय), इयत्ता 3 री – निकीता भागवत पाटील (प्रथम), देवेश धनेश्वर चौधरी (द्वितीय), सोहम मुरलीधर बेंडाळे (तृतीय), इयत्ता 4 थी वेदांत राजेश चौधरी (प्रथम), खुशी सोनार (द्वितीय), पुर्वेश चौधरी (तृतीय) सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे चेअरमन राहूल सोनार व सर्व संचालकांनी अभिनंदन केले.