एमआयटी कोथरुड दुसऱ्या, तर एमआयटी आयओडी तिसऱ्या, एसपी कॉलेज चौथ्या स्थानावर
पुणे : एमआयडी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर यांच्यातर्फे आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विश्वानाथ स्पोर्टस् मीट २०१९ च्या क्रीडा स्पर्धांमध्ये एमआयटी – एडीटी विद्यापीठीतील एमआयटी महाराष्ट् अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ॲण्ड ट्रेनिंग (मॅनेट) संघाने सर्वाधिक ८ सुवर्ण आणि ११ रौप्य पदक जिंकत सर्वसाधारण जेतेपदावर आपले नाव कोरले. तसेच एमआयटी कोथरूड संघाने ६ सुवर्ण आणि २ रौप्य पदकासह दुसरा क्रमांक, तर एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (आयओडी) संघाला ५ सुवर्ण पदक आणि ८ रौप्य पदकासह तिसरा क्रमांकांचे बक्षिस मिळाले. सर परशुराम कॉलेज (एसपी कॉलेज), पुणे संघाने ५ सुवर्ण, तर २ रौप्य पदक जिंकत चौथ्या क्रमांक पटकावला.
राज्यस्तरीय तिसऱ्या आंतरमहाविद्यालयीन विश्वनाथ स्पोर्टस् मीट २०१९ च्या सर्वसाधारण विजेत्यांसह सर्व १३ खेळ प्रकारातील वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारातील विजेत्यांना सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि ट्रॉफी देऊन प्रमुख पाहुणे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगचे ब्रिगेडियर रवींद्र एस नायडू, ट्रनिंग ऑफिसर आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट चे लेफ्टं कर्नल धारासिंग चहल, ऑलिंम्पियन सुभेदार बसंत बहादूर राणा, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या (मिटकॉम) संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव शिवशरण माळी, डॉ. महेश देशपांडे, विश्वनाथ स्पोर्टस् मीट २०१९ च्या नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आशिष पानट, विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर नायडू म्हणाले की, देशात खेळाचे वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी शालेय स्तरावरून तयारी करून घ्यावी लागेल. त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयात खेळासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. खेळांमुळे खेळाडूंतील आत्मविश्वास आणि क्षमता वाढण्यास मदत होते. परिणामी खेळाचा हेतू साध्य होतो. आपल्या खेळाशी प्रतिबधता राखून मेहनत केल्यास यश हमखास मिळते.
सुभेदार बसंत बहादूर राणा म्हणाले, देशात खेळात अनेक गुणवत्ताधारक खेळाडू आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील. खेळांकडे विद्यार्थ्यांनी वळावे. खेळामुळे वैयक्तिक आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर होईल. खेळाची जिद्ध असावी, तर यश आपल्याला मिळेल.
डॉ. मंगेश कराड म्हणाले की, विश्वनाथ स्पोर्ट मीट – २०१९ च्या चार दिवशाच्या खेळात अनेक खेळाडूंनी इतिहास घडावला आहे. बुद्धीवान खेळाडू घडविण्याचा आमचा उद्देश आहे. देशासाठी आणि राज्यासाठी पदक जिंकणारे खेळाडू तयार करून खेळात जगाचे नेतृत्व करणार देश घडविण्याची आमची जबाबदारी आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल शिरसाट व प्रा. पायल शहा यांनी केले. डॉ. रेणु व्यास यांनी आभार मानले.
अंतिम निकाल
कॉलेजचे नाव— सुवर्ण—रौप्य
एमआयटी मॅनेट—८—११
एमआयटी कोथरूड—६—२
एमआयटी आयओडी—५—८
एसपी कॉलेज—५—२
एमआयटी डब्ल्यूपीयू—४—१
गरवारे कॉलेज—३—१
नेस वाडिया कॉलेज—३—१
अनंतराव पवार कॉलेज—३—०
सीओईपी—३—२
डॉ. डी वाय पाटील कॉलेज—२—१
आबासाहेब कॉलेज—२—१
पी. जोग कॉलेज—-२—१
व्हीआयआयटी कोंडवा—१—३
बीजेएस कॉलेज—२—१
भारती विद्यापीठ—१—०
एसएम शेट्टी कॉलेज मुंबई—१—०
एआयटी दिघी—०—३