धुळे – धुळ्यात रोटरी क्लब ऑफ विद्यानगरी आयोजित सूर्यकांता करंडक राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत कल्याणच्या ’दर्द पोरा’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकविला. व्दितीय क्रमांक डोंबिवलीच्या स्वामी नाट्यंगण संस्थेच्या ’मेड फॉर इच ऑदर’ या एकांकिकेने पटकविला. तर तृतीय क्रमांक मुंबईच्या क्युरियस थिएटर संस्थेच्या ’एक्सपायरी डेट’ या एकांकिकेने पटकविला.शहरातील हिरे भवन येथे शनिवारी व रविवारी दोन दिवसीय एकांकिका स्पर्धा झाली. बक्षीस
वितरण समारंभ कॉमेडी बुलेट ट्रेनचे सचिन गोस्वामी यांच्या हस्ते झाला. यावेळी आशिष अजमेरा, शैलेश पाटील, रीक्षक पदमनाथ बिंड, शिवराम घोडके, मालती झाडे, प्रकल्पप्रमुख कैलासपती चित्तम, प्रकल्प सचिव वैभवकुमार जगताप, डॉ.आर.बी.पाटील, अतूल अजमेरा आदी उपस्थित होते.
निखिल व बागेश्वरी सर्वोत्तम कलाकार
वैयक्तिक पुरस्कार पार्श्व संगीतमध्ये प्रथम पुरस्कार राजेश राहुल (दर्द पोरा) कल्याण, व्दितीय पुरस्कार प्रसाद चौबळ यांनी पटकविला. प्रकाश योजना – प्रथम राजेश शिंदे, व्दितीय विराज जयवंत यांनी पटकविला. रंगभूषा – प्रथम पुरस्कार दीपक भुसारी, व्दितीय अनूप माने यांनी पटकविला. नेपथ्य – प्रथम पुरस्कार सुजय भालेराव, व्दितीय अभिजित झारराव यांनी पटकविला. दिग्दर्शक – प्रथम अभिजित झुंझारराव, व्दितीय संदीप दंडवते यांनी पटकविला. अभिनय – (पुरुष) प्रथम पुरस्कार निखिल ठाकूर, व्दितीय विनायक चव्हाण यांनी पटकविला. अभिनाचा (स्त्री) – प्रथम पुरस्कार बागेश्वरी निंबाळकर, व्दितीय सोनाली मगर यांनी पटकविला. लक्षवेधी एकांकिका पुरस्कार धुळे येथील मानवता संस्थेच्या कैरी एकांकिकेला देण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक नाटकात उत्कृष्ट भूमिका करणार्या कलाकारांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. त्यात वैष्णवी तांबट, नम्रता सुळे, अक्षय जाधव, सिध्दार्थ चव्हाण यांना बक्षीस प्रदान
करण्यात आले.सांस्कृतिक चळवळ जोपासण्यासाठी खान्देशासह राज्यभरात प्रयोगशाळा निर्माण झाल्या पाहिजेत. एकांकिका ही एक प्रयोगशाळा आहे. सूर्यकांता राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा खान्देशातील युवकांना व्यासपीठ आहे. या स्पर्धेतील एकांकिका पाहण्यासाठी धुळेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला, त्यामुळे नवीन कलाकारांचे मनोबल वाढणार आहे, असे कॉमेडी बुलेट ट्रेनचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सांगितले.