राज्यस्तरीय खुली कराटे स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी

0
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत विशाल वाकडकर सोशल फाऊंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नितीन काकडे यांच्या वतीने रविवारी दि. 9 रोजी वाकड येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात राज्यस्तरीय खुली कराटे स्पर्धा घेण्यात आली. प्रथम चषक डँ्रगन मार्शल आर्ट (पुणे), द्वितीय चषक आँल कराटे चँम्पियन अकॅडमी (नाशिक), तृतीय चषक डिफेन्स स्पोर्टस अकॅडमी (पिंपरी चिंचवड) यांनी पटकाविले. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरासह राज्यभरातून 700 ते 800 मुला-मुलींनी सहभाग नोंदविला.
विजयी स्पर्धकांचा सन्मान…
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, शंकरभाऊ मांडेकर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, राजेंद्र साळुंखे, शंकरराव वाकडकर, तानाजी हुलावळे, दिलीप हुलावळे, विशाल काळभोर, मयुर जाधव, हर्षवर्धन भोईर, कुणाल थोपटे, निलेश निकाळजे, विशाल पवार, विनायक काळभोर, भागवत जवळकर, अमोल पाटील, काशिनाथ तेलंगे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सहभागी सर्व खेळाडूं सोबतच मलेशिया येथे आयोजित कराटे स्पर्धेत सहभागी तसेच विजयी होणार्‍या पिंपरी चिंचवडच्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी कराटे क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.