राज्यस्तरीय खुल्या गीतगायन स्पर्धेस मिळाला गायकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0

शिरपूर। येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष, मुंबई श्री विलेपार्ले केळवणी मंडळ सह-अध्यक्ष तसेच प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन आणि शिरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भुपेश पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी 24 रोजी भुपेश पटेल फ्रेंड सर्कल यांच्यामार्फत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेस उत्तम प्रतिसाद लाभला असून कार्यक्रमात लहान गटात 64 व मोठया गटात 101 स्पर्धकांनी सहभाग घेतला. राज्यस्तरीय खुल्या गीत यागन स्पर्धेची निवड चाचणी शिरपूर शहरातील आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसच्या एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेतून दोन गटातून 34 उत्कृष्ट गायकांची निवड करण्यात आली आहे. यांची अंतिम फेरी पुढे ढकलण्यात आली असून अंतिम तारीख कळविण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन स्वराली पाटील व रोनक कोचर या चिमुकल्या गायकांनी केले.

101 स्पर्धकांचे गायन
’ब’ गटात 14 वर्षावरील 101 स्पर्धकांनी गीतगायन केले. यात निखिल जगताप, किशोर खंडाळे, तेजस नाईक, राजेंद्र शिरसाठ, महेश महाजन, अमोल शिरसाठ, तेजस्विनी शिरसाठ, जगदिश थोरात, सुवर्णा माळी, पंकज पाटील, मधू राय, अनुराग जगदाळे, पल्लवी खलाळकर, शोएब बेग, अंजली पावरा, गायत्री राजपूत, तन्मयी पाटील, शुभम रासने, मयूर वाघ, वैदही ब्रह्मभट यांनी बाजी मारली आहे. अंतिम फेरीत विजयी ठरणार्‍या यशस्वी स्पर्धकांना 11 हजार 111 रुपयाचे प्रथम, 7 हजार 777 रुपयाचे द्वितीय तर 5 हजार 555 चे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे.

यांचे लाभले सहकार्य
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुपेश पटेल फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, किशोर रणदिवे, शिरपूर तालुका विकास योजनेचे सर्व स्वयंसेवक पदाधिकारी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन अनिल जाधव यांनी केले. आभार सुभाष कुलकर्णी यांनी मानले. स्पर्धेचे परीक्षक वैशाली पाटणकर, एस.डी.पाटील, डॉ.सीमा वैद्य, रमाकांत कढरे यांनी जबाबदारी सांभळली. तसेच गौरव कलंगे, किशोर शिरसाठ, चंद्रकांत मैलागे, मनोज सोनवणे यांनी खूपच सुंदररीत्या संगीताची साथ दिली.

तीन पारितोषीक
’अ’ गटात 5 ते 14 वर्षे वयोगटातील 64 गायकांनी सहभाग घेवून अतिशय सुंदररीत्या गीताचे सादरीकरण केले. 13 बालकलाकारांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. यात यश महेंद्र निकम, धिरज जगताप, वैभव चव्हाण, तनुप्रिया महेशचंद्र , मुग्धा देवराज, मेघना ठाकूर, तेजस पाटील, वैष्णवी ठाकरे, मोहित सावंदे, चेतेंद्र पवार, सिमतिनी चौधरी, आर्यन पाटील, साची शहा यांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत यशस्वी ठरणार्‍या स्पर्धकांना 7 हजार 777 चे प्रथम पारितोषिक, 5 हजार 555 चे द्वितीय पारितोषिक तर 3 हजार 333 चे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे.