राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत 75 शाळेतील 290 विद्यार्थ्यांचा सहभाग

0

नंदुरबार : कोविड 19 (कोरोना) आजाराची जनजागृती होण्यासाठी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन नंदुरबारच्या कलाविष्कार प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत 75 शाळतील 290 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना सुट्या असल्याने घरात राहूनच आयोजकांच्या क्रमांकावर काढलेले चित्र पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये लपलेल्या कलागुणांमध्ये वाढ होण्यासाठी व सुट्टीचा सदुपयोग होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता.

चित्रकला स्पर्धेचा असा आहे निकाल – पहिला गट (पहिली ते चौथी)-
प्रथम क्रमांक- सना राम बुटके (चौथी, संजुबा हायस्कुल, नागपूर, ता.जि.नागपूर), द्वितीय- निर्मिती जयदीप पवार (पहिली, प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिर, नंदुरबार), तृतीय- संचिता प्रदीप देसले, (तिसरी, चावरा इंग्लिश मेडिअम स्कुल, नंदुरबार), उत्तेजनार्थ- धम्मदीप अमोल पाटोळे (चौथी, नेमसुशील प्राथमिक विद्यामंदिर, तळोदा)

द्वितीय गट (पाचवी ते दहावी)-
दुसर्‍या गटात स्पर्धेत अतिशय चुरस असल्यामुळे प्रत्येक क्रमांकाची दोन बक्षिसे परीक्षकांनी काढली. प्रथम- मयुर गोकुळ पाटील (दहावी, नानासो.झेड.बी.पाटील हायस्कुल, देवपूर ता.जि.धुळे) व दर्शन संजयकुमार पाटील (नेमसुशिल विद्यामंदिर, तळोदा), द्वितीय- मेहुल चंद्रशेखर चौधरी (दहावी, डी.आर.हायस्कुल, नंदुरबार) व सायली रवींद्र दुसाने (दहावी, विद्या प्रबोधिनी प्रशाला, भोसला, जि.नाशिक), तृतीय- राधेश भुपेंद्र पाटील (सातवी, अहिंसा इंटरनशनल स्कुल, नंदुरबार) व ओम उमेश चौधरी (सातवी, प्रताप विद्यामंदिर, चोपडा, जि.जळगाव), उत्तेजनार्थ- किशोरी अशोक पाडवी (दहावी- वनवासी विद्यालय, चिंचपाडा ता.नवापूर, जि.नंदुरबार) व मनीष सोमवंशी (दहावी, डी.आर.हायस्कुल, नंदुरबार). दरम्यान, विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसामध्ये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र नविन शैक्षणिक वर्षात शाळा नियमीत सुरू झाल्यावर देण्यात येणार असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. बक्षिस समारंभा बाबत स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना शाळेत व पालकांना मोबाईलवर कळविण्यात येईल. ह्या स्पर्धेत सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कोरोनो जनजागृती चित्रकला स्पर्धेचे आयोजक कलाविष्कार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रदीप देसले, उपाध्यक्ष सिद्धांत माळी, सचिव महेश पाटिल,क ोषाध्यक्ष रविकिरण पाटील, संचालिका शिला पाटील यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.