दोंडाईचा । येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थांनी नांदेड येथे आयोजित राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धत सहभाग नोंदवत यश संपादन केले.7 ते 9 जुलै असे तीन दिवस नांदेड येथे राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धत दोंडाईचा येथील स्वामी विवेकानंद स्कुलच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदविला होता. त्यात अभय चुनिलाल कोळी, इंद्रजीत गजानन काळे,कृष्णदिप करणसिंग गिरासे,सचिन गोविंद महानरे ह्या विद्यार्थांनी तिसरा क्रमांक पटकावत यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थांचे भारतीय तलवारबाजी संघटनेचे सचिव अशोक दुधारे, उदय डोंगरे,स्वामी विवेकानंद स्कुलचे अध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब रावल,सचिव शिप्रा रावल,प्राचार्या संगिता राजपूत, अनिता जयसिंगाणी, मुमताज बोहरी , ज्योत्सना वाणी, धुळे जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव कैलास कंखरे, क्रिडा शिक्षक जयेश राजपूत यांनी कौतुक केले.