राज्यस्तरीय थाय बॉक्सीन स्पर्धेसाठी भडगाव तालुक्यातील 4 विद्यार्थ्यांची निवड

0

भडगाव :  नाशिक विभागीय थाय बॉक्सिंग शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन मिनाताई ठाकरे क्रीडा संकुल नाशिक येथे नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील एकूण 100 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातीचे प्रतिनिधित्व करीत भडगाव तालुक्यातील एकूण 8 खेळाडूंपैकी 4 खेळाडूंची वेगवेगळ्या गटातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय शालेय थाय बॉक्सिंग स्पर्धा पुढील महिन्यात जानेवारी-2017 ला आयोजित करण्यात येणार आहेत. सर्व विजयी खेळाडूंना द जळगाव जिल्हा थाय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी, उपाध्यक्ष शाम पाटील, नगरसेवक वसिम मिर्झा, सौरभ देशमुख, संतोष पाटील, सौरभ पाटील, तसेच संघटनेचे सचिव व प्रशिक्षक अबरार खान अजगर खान आणि सल्लागार शहेबाज अहमद शेख ताहीर, हुसेन शेख, डॉ.आदील अमान, अशपाक शेख, हाजी खालील शेख यांनी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे
दर्षना मोतीराम गोसावी (सुवर्ण पदक) वजन गट 57-60 किलो, लाडकूबाई विद्यामंदिर व ज्यूनिअर कॉलेज भडगाव, चेतन प्रकाश पाटील (सुवर्ण पदक) वजन गट 54 -57 किलो, लाडकूबाई विद्यामंदिर व ज्यूनिअर कॉलेज भडगाव, विजय भास्कर राठोड (सुवर्ण पदक) वजन गट 48-51 किलो, माध्यमिक विद्यालय आमडदे ता.भडगाव, कुणाल राजेंद्र पाटील (सुवर्ण पदक) वजन गट 51 ते 53 किलो, कै.पुनम विजयराव पवार विद्यालय, भडगाव यांचा समावेश आहे.