राज्यस्तरीय पुरस्काराने वा.ना.आंधळेच्या ‘फर्मान’चा गौरव

0

एरंडोल। येथील गझलकार तथा लेकवाचवाअभियानाचे पुरस्कर्ते प्रा.वा.ना.आंधळे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या. फर्मान आणि इतर कविता या काव्यसंग्रहास संताजी व मातोश्री प्रतिष्ठान नागपूर या संस्थेचा मातोश्री राज्यास्थरीय पुरस्कार घोषित झाला असून एक हजार रुपये रोख,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतीष्ठानाच्या माध्यमातुन दरवर्षी उत्कृष्ट काव्यसंग्रहास हा पुरस्कार देण्यात येतो. रविवार 16 जुलै 2017 रोजी दरम्यान स्नेहनगर नागपूर येथील समाजाभावनात प्रा.वा.ना.आंधळे यांना गौरविण्यात येणार आहे.

प्रा.आंधळे हे साडेतीन दशकापासून काव्यलेखन करीत असून बालभारती, युवकभारती तसेच विद्यापीठ अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांना मनाचे स्थान लाभले आहे. त्यांची ‘आई मला जन्म घेऊ दे’या एकमेव कवितेने सातासमुद्रापार जाण्याची यशदायी वाटचाल केली असून इंग्रजीसह 45 भारतीय भाषांमध्ये या कवितेचा अनुवाद झाला आहे. सध्या सह्याद्री दुरदर्शन वाहिनीवरून सुरु असलेल्या सावित्री एक क्रांती व आवर्तन या मराठी मालिकांसाठी शीर्षकगीत लेखन केले आहे. त्यांच्या या गौरवशाली यशाबद्दल साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक परिवारातून अभिनंदन होत आहे.