राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

0

नंदुरबार। महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन व चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 31 वी ज्युनिअर मुले स्पर्धेसाठी नंदुरबार येथील प्रथमेश रुपचंद मराठे व अभय भगवान तलवारे यांची निवड करण्यात आली आहे. जळगांव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनतर्फे भुसावळ येथे दि.22 जून 2017 रोजी विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांनी अंतिम सामन्यात जळगाव येथे खेळाडूंचा पराभव केला.

27 ते 29 जून चंद्रपूरला स्पर्धा
या स्पर्धेत प्रथम रुपचंद मराठे (50 किलो वजनगट) व अभय भगवान तलवारे (63 किलो वजनगट) यांनी अंतिम सामन्यात जळगांव येथील खेळाडूंचा पराभव करत विजय संपादन करुन त्यांची दि.27 ते 29 जून 2017 दरम्यान चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात होणार्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोघा यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक राकेश माळी, जितेंद्र माळी, आकाश बोढरे, जगदिश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष मनोजभैय्या रघुवंशी, उपाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, सचिव राकेश माळी, क्रीडा संघटक मयुर ठाकरे, मनोज माळी, कैलास माळी, दीपक पाटील, प्रकाश पाटील, प्रसाद मराठे आदींनी त्यांचे अभिनदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.