राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वैष्णवी सहस्त्रबुद्धे द्वितीय

0

पुणे । शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने 6 नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होेेते. माझी कन्या भाग्यश्री राज्यस्तरीय मेळावा आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील 26 स्पर्धकांना निमंत्रीत करण्यात आले होते. या स्पर्धेत भोर येथील वैष्णवी समीर सहस्त्रबुद्धे हिने द्वितीय क्रमांक पटकाविल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 13 तालुक्यातील 8 वी ते 10 वीच्या वर्गातील तसेच 11 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या गटामधील प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना निमंत्रित करण्यात आले होते. निबंध स्पर्धा, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेतील तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे गट तयार करण्यात आले होते. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भोरमधील राजा रघुनाथ विद्यालयातील वैष्णवीने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर विभागीय स्तरावरही तिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. निबंध स्पर्धेत अमृतराव बादल विद्यालयाच्या सोनम विनोद शर्मा हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

या विद्यार्थ्यांनी मारली बाजी
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 8 वी ते 10 वीच्या गटात दिप्ती जांभुळकर, राजवर्धिनी कोकणे, नम्रता मोरे, वक्तृत्व स्पर्धेत 11 वी ते 12 वी गटात वैष्णवी सहस्त्रबुद्धे, सायली आरूडे, समृद्धी वागजकर, निबंध स्पर्धेच्या 8 वी ते 10 वीच्या गटात सोनमशर्मा, योगिता शितोळे, कार्तिकी बर्गे, निबंध स्पर्धा 11 वी ते 12 वी गटात प्रिती गोपाळे, शिवानी जगताप, अक्षता धनवे, घोषवाक्य 8 वी ते 10 वीच्या गटात प्रज्ञा दानवले, सुप्रिया रसाळ, साक्षी गुणवरे, चित्रकला स्पर्धा 8 वी ते 10 वी गटात सानिका कांबळे, मोनिका कोलते, श्रृती राजीवडे, चित्रकला स्पर्धा 11 वी ते 12 वी गटात किशोरी वैराळ, काजल लोंढे, ताहुरा इनामदार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.