राज्यस्तरीय शिवपुत्र संभाजीराजे महाराष्ट्र गौरव सोहळा उत्साहात

0

नाशिक : नाशिकच्या शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय शिवपुत्र संभाजीराजे महाराष्ट्र गौरव पुरस्कार-2016 वांगणी-बदलापूर बी. आर. हरणे कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष मंगेश हरणे व स्वेच्छेने शिर्डी संस्थान व मुंबई विद्यापीठाचे ऑडिटचे काम पाहणारे सी. ए. अभिजित शरदचंद्र गायकवाड यांना नाशिक येथे झालेल्या एका समारंभात शिक्षक पदवीधर संघाचे आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांच्या हस्ते देण्यात आला. या सोहळ्यास आमदार सुधीर तांबे, नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, कवी नारायण सुमंत, जोंधळे विद्यासमूहाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव जोंधळे, नासामधील शास्त्रज्ञ अपूर्वा जाखडी, उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते.