भुसावळ- महाराष्ट्र राज्य चर्मकार समन्वय समितीचे औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधनी सभागृहात ‘सामाजिक समस्या आणि उपाय योजना’ या विषयावर समाजातील विविध क्षेत्रातील विचारवंत व तज्ञ व्यक्तींचे चर्चासत्राचे आयोजन व संत रवीदास समाजरत्न पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रादेशिक सचिव सुधीर रामदास तायडे यांना संत रवीदास राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी भाऊलाल निंभोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक तथा चर्मकार आयोगाचे अध्यक्ष वाय.सी.पवार, चर्मकार आयोगाचे सदस्य भैय्यासाहेब बिघाणे, अर्जुन मरुडकर, विक्रीकर उपायुक्त हेमलाल बाखरे, चर्मकार समन्वय समितीचे प्रमुख विजय घासे, मुंबई उच्च न्यायालयातील अॅट्रासिटी तज्ज्ञ अॅड.नारायण गायकवाड, औरंगाबाद उच्च न्यालयाचे अॅड.रमेश इमले, सुप्रसिध्द उद्योजक भगवान निंभोरे, ज्येष्ठ विचारवंत अशोक आगावणे, लहू बावस्कर होते. चर्चासत्रात सर्व उपस्थितांनी सहभाग घेतल्याने सामाजिक समस्यांवर विचार मंथन होवून त्यावर योग्य त्या उपाययोजना ही मांडण्यात आल्या.