वरणगाव । शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्यस्तरीय समितीने बुधवार 20 रोजी भेट दिली. धुळे महानगरपालिकेचे उपआयुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी, अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी यांचा या समितीमध्ये समावेश होता. समितीने शहरातील प्रभाग 2, 3, 14, 8 मधील मॉडेल शौचालय तसेच शहरातील ओडी स्पॉट व नागरीकांनी बांधलेल्या वैयक्तीक शौचालय, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व गंगाधर सांडू विद्यालय इतर शाळांची पाहणी करुन विद्यार्थी व नागरीकांशी सवांद साधला. ज्या नागरीकांनी शौचालय बांधले नाही त्यांनी नगरपरिषदेकडे अर्ज करुन शौचालयाचे बांधकाम करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
समितीमध्ये यांचा होता समावेश
यावेळी समितीमध्ये रविंद्र जाधव, राजेश कानडे, उत्कर्ष गुटे, योगेश सोनवणे यांच्या सोबत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बांधकाम अभियता डिगंबर वाघ, गंभीर कोळी, संजय माळी, राजू गायकवाड, रविकांत डांगे, कुणाल पाटील, दिपक भंगाळे आदी उपस्थित होते.