मुंबई – राज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वीचे महाअधिवक्ता रोहीत देव यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावर नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त आहे.
कुंभकोणी यांना वकिली व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांत उच्च न्यायालयात शासनाची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. एक निष्णात व प्रथितयश वकील म्हणून त्यांची ख्याती आहे.