राज्याच्या रेडीरेकनर दरात जवळजवळ ६ टक्क्यांनी वाढ

0

मुंबई- राज्यातील मुद्रांकशुल्काच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने शनिवारी व्यवहार दरात म्हणजेच रेडिरेकनरच्या दरात ४.७४ टक्क्यांपासून ७.१३ टक्क्यांपर्यंत म्हणजेच सरासरी ५.८६ टक्क्यांची वाढ केली. शनिवारपासूनच याची अंमलबजावणी होणार आहे.

राज्याच्या ग्रामीण भागात म्हणजेच ४१ हजार ६७८ गावांमध्ये ७.१३ टक्के वाढ करण्यात आली आहे. प्रभाव क्षेत्रात (१७८८ गावे) ६.१२ टक्के, नगर परिषद किंवा नगर पंचायत क्षेत्रात ५.५६ टक्के, महापालिका क्षेत्रात ४.७४ टक्के वाढ करण्यात आली आहे. विधान परिषदेत शनिवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे निवेदन केले.

महापालिका क्षेत्रात १.७१ टक्क्यांपासून ९.८२ टक्क्यांपर्यंत वाढ करम्यात आली आहे. मुंबई (३.९५), ठाणे (३.१८), मीरा-भाईंदर (२.६६), कल्याण-डोंबिवली (२.५६), नवी मुंबई (१.९७), उल्हासनगर (२.८८), भिवंडी-निजामपूर (१.७१०, वसई-विरार (२.०३), पनवेल (३.१७), पुणे (३.६४), पिंपरी-चिंचवड (४.४६), सांगली-मीरज-कुपवाड (४.७०), कोल्हापूर (३.००), सोलापूर (६.३०), नाशिक (९.३५), मालेगाव (६.१८), धुळे (६.६९), जळगाव (९.४५), अहमदनगर (९.८२), औरंगाबाद (६.२३), नांदेड-वाघाळ (६.९४), लातूर (५.३४), परभणी (६.३९), नागपूर (१.५०), चंद्रपूर (५.००), अमरावती (६.००) आणि अकोला (३.००) टक्के अशी वाढ करण्यात आली आहे. २०१० सालापासून करम्यात लेली ही सर्वात कमी वाढ असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.