राज्याच्या विनाशाचा युती सरकारचा अजेंडा : साठे

0

जनसंवाद बैठकीमध्ये केला आरोप

पिंपरी : चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करु असे स्वप्न दाखवून भाजपाने सत्ता मिळवली. मात्र, भाजप-सेनेच्या राज्यातील सरकारमुळे मागील चार वर्षात महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाल्याचे आकडेवारी सांगते. महाराष्ट्राच्या विनाशाचा युती सरकारचा हा अजेंडा काँग्रेसचे कार्यकर्ते जनसंवाद बैठकीतून जनतेसमोर मांडणार आहेत, असे मत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

पिंपरीमध्ये जनसंवाद अभियान
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्रत्येक प्रभागात जनसंवाद अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अजमेरा स्कूलसमोर जनसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, संजय साळवी, जगदीश तिमय्या शेट्टी, प्रदेश सदस्य संग्राम तावडे, प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, मनोज चौधरी, चिंचवड युवा अध्यक्ष मयुर जैयस्वाल, किरण पवार, जेम्स जॉर्ज, श्रीरंग सरपाते, रऊफ सय्यद, बबलू शेख, राकेश गाऊंडर, उमेश लोहोकरे, निलकंठ तागतोडे, नवनाथ चौधरी, राजू चव्हाण, भास्कर शिंदे, शरद रोंघे, अकराम देशमुख, निखील निकम आदी उपस्थित होते.

लाखो कामगार बेरोजगार
साठे पुढे म्हणाले की, युती सरकारने लादलेल्या चुकीच्या निर्णयामुळे लाखों कामगार बेरोजगार झाले आहेत. शेती, उद्योग, व्यापार, रोजगार, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाबाबत दिलेली सर्वच आश्‍वासने फोल ठरली आहेत. चार वर्षात ‘विकास’ सापडलाच नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण करुन टक्केवारीतून ‘स्व:विकास’तरी करुन घेऊ. या कुटील नितीतून पालकमंत्री पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांवर अन्याय करीत आहेत. सूत्रसंचालन गौरव चौधरी यांनी केले. आभार बबलू शेख यांनी मानले.