धुळे- खाजगी आरोग्य सेवा सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेली आहे. कुटूंबातील एक व्यक्ती आजारी पडलीतर सर्व कुटूंब उध्दस्त होते. अन्न,वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांसह आरोग्य सेवा महत्वाची आहे. राज्यातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी राज्यसरकार कटीबध्द आहे असे मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले. धुळे येथील चक्करबर्डी परिसरात आयोजित भव्य अटल आरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री जयकुमार रावल, खा. हिना गावीत, आमदार स्मिता वाघ, आ.अनिल गोटे, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डी.गंगाथरण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येकाला मिळाला आरोग्य सेवा
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या आरोग्य कुंभमेळ्याची संकल्पना वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची आहे. सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत आरोग्य सेवा पोहचली पाहिजे. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनात रुग्णांची तपासणी केली जात आहे. मुंबईसह देशातील विविध तज्ञांच्या हातून रुग्णांची तपासणी केली जात आहे. रुग्णांचा डेटा तयार केला जात आहे. रुग्णांच्या घरापासून ते त्यांचे ऑपरेशन करुन त्याला पुन्हा घरापर्यंत पोहचविले जात आहे. ही सर्व सेवा मोफत केली जात आहे. आतापर्यंत 25 लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी लाखो रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे. असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.
अटल आरोग्य शिबिर राजकिय नाही मंत्री गिरीष महाजन
अटल आरोग्य शिबीर हे राजकिय नाही. धुळ्यातील सर्व नागरिकांसाठी शिबीर मोफत आहे. सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी व्हावे. या शिबीरात सर्व आजारांवर उपाचार करण्यात येणार आहे. मुंबई येथून वैद्यकीय तज्ञांतीच टीम धुळ्यात दाखल झाली आहे. अनेक डॉक्टरांची एक महिला तारीख मिळत नाही. असे तज्ञ शिबीरात दाखल झाले आहे. धुळे, नाशिक, मुंबई येथील नामांकित रुग्णालयात रुग्णांवर ऑपरेश केले जाणार आहे. या शिबिरात राज्यात 3 हजार डॉक्टर दाखल झाले आहेत. राज्यातील हे 135 वे शिबीर आहे. 30 ते 40 हजार रुग्णांचे ऑपरेशन केले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुखी राहावे यासाठी हा प्रयत्न आहे. असे मत मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केले.
विकासात धुळ्याच्या वाटा शेवटी – मंत्री जयकुमार रावल
महाराष्ट्र राज्याचा विकास होत असतांना या विकासात शेवटचा क्रमांक धुळे जिल्हाचा असतो. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ नेहमीचाच, सिचंन व्यवस्था, रोजगार आणि पाणी प्रश्न हा जिल्हाचा कळीचा प्रश्न त्याकडे लक्ष देण्याचे गरज आहे. महागड्या आरोग्य सेवेने सर्व सामान्य रुग्णांचे कंबरडे मोडले आहे. एख्याद्या कुंटूंबातील व्यक्तीला कॅन्सर सारखा आजार जडला तर सर्व कुंटूबच उध्दस्त होते. अशा वेळी अटल आरोग्य शिबीर संजीवनी ठरले आहे. आरोग्य शिबिरोच प्रास्ताविक डॉ. लहाने यांनी केले तर सुत्रसंचालन रामेश्वर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.