पिंपरी:- राज्यात रोज कोरोना विषाणूचे रुग्णांचा आकडा वाढत आहे. या परिस्थितीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे.
“महाराष्ट्रातील सध्याची पारिस्थती बघता, ज्या वेगाने कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. त्यानुसार फार सतर्क राहावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात अधिक मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. तसेच पुन्हा लॉकडाउनपेक्षा यातून पुढे कसे जाता येईल आणि कोरोनाला कसे रोखता येईल हा प्रयत्न करावा लागेल. असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा आढावा घेत त्यांनी स्थानिक प्रशासन तसेच कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले आहे.
“पुन्हा लॉकडाउन होईल अशी पारिस्थती दिसत नाही. नागरिकांची तशी मानसिकता देखील नाही, नागरिकांमध्ये जनजागृती वाढवली पाहिजे. कोरोना अधिक वाढू नये यासाठी लॉकडाउन नसतानाही कोविडच्या संबंधी जे प्रोटोकॉल आहेत ते कसे पाळता येतील याच्यावर जास्त भर द्यावा लागेल. म्हणून, पुन्हा लॉकडाउनऐवजी यातून पुढे कसे जाता येईल आणि कोविड रोखता करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल” असेही फडणवीस म्हणाले.