राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४२

0

पुणे: देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. पुण्यातील एका महिलेला कोरोना विषाणूची लागन झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४२ वर पोचली आहे. पुण्यातील बाधित महिला ही फ्रान्सहून आली आहे. ती नेदरलँड्सलाही जाऊन आली होती. परदेशातून आल्यामुळं तिची तपासणी करण्यात आली होती. त्यात तिला करोनाची बाधा झाल्याचं समोर आले आहे.

बाधित महिला ज्या कारमधून आली होती, त्या कारचालकाला आणि तिच्या घरातील मोलकरणीलाही नायडू रुग्णालयात आणण्यात आलं आहे. त्या दोघांचीही चाचणी सुरू आहे.पुण्यातील ‘करोना’ग्रस्तांची संख्या ८, तर पिंपरी-चिंचवडमधील ‘करोना’ग्रस्तांची संख्या १० झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली आहे.

गर्दी टाळणं हा करोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यभरात त्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकारनं मॉल, शाळा, महाविद्यालय अशा गर्दीच्या ठिकाणं बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, गावोगावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक, शिर्डीतील साई मंदिरासह राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरं बंद ठेवली आहेत. पुणे, नागूपरसारख्या महानगरांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.