राज्यातील दोन जवानांना वीरमरण

0

जम्मू काश्मीर । पूँछमध्ये झालेल्या चकमकीत, महाराष्ट्रातल्या दोन जवानांना वीरमरण आले आहे. संदीप सर्जेराव जाधव आणि सावन बालकू माने अशी या शहीदांची नावे आहेत. संदीप जाधव हे औरंगाबादचे आहे, तर सावन माने कोल्हापूरचे आहेत. या दोघा जवानांना वीरमरण आल्याचे वृत्त समजताच, त्यांच्या गावावर शोककळा पसरली. सावन माने हे कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातले आहेत. त्यांचे पार्थिव शरीर शुक्रवारी दुपारी दिल्लीला आले. शनिवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी ते पोहोचणार आहे असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान शाहूवाडी तालुक्यातल्या गोगवे गावावर शोककळा पसरली आहे.

घुसखोरी दरम्यानच्या चकमकीत झाले शहीद
कृष्णा घाटी परिसरात नियंत्रण रेषेपाशी बॅटच्या सैनिकांच्या मदतीने दहशतवाद्यानीं 600 मीटर आत घुसखोरी केली. ते घुसखोरी करीत असताना, पाकिस्तानी लष्कर व बॅटतर्फे भारतीय चौक्यांवर सातत्याने गोळीबार करीत होते. दुपारी दोन वाजण्याच्या हा प्रकार घडला. भारतीय जवानांनीही बॅटच्या व पाक लष्कराच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला गोळीबारात एक जण जखमी व एक ठार झाला. नंतर जखमी दहशतवादीही मरण पावला. मात्र या ऑपरेशनमध्ये औरंगाबादचे नाईक संदीप जाधव व कोल्हापूरचे शिपाई सावन माने या दोघांना वीरमरण आले. पाकिस्तानी लष्करातील 40 ते 50 सैनिकांचा बॅट हा गट सातत्याने दहशतवाद्यांच्या भारतातील घुसखोरीसाठी मदत करताना आढळून आले आहे. बॅटमधील सैनिकांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.