राज्यातील राजकारणाला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काळीमा -उमेश नेमाडे

0

जिल्हास्तरीय राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षांची घेतली बैठक ; लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीची तयारी

भुसावळ- महाराष्ट्रातील राजकारणाला मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून काळीमा फासला जात आहे. हा प्रकार निंदनीय असून अशा राजकारणाचा आम्ही निषेध करीत असून राज्य शासनाने शेतकरी व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारचे काम करण्याची आवश्यकता आहे. शिवाय येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम असल्याचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.

तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार्‍या तालुकाध्यक्षांचा झाला सन्मान
रविवारी सुरभी नगरातील ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी जिल्ह्यातील ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षांची बैठक घेतली.बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार्‍या तालुकाध्यक्षांचा सन्मान होणे आवश्यक आहे.लोकसभा-विधानसभा निवडणुक लक्षात घेता तालुकाध्यक्षांनी तालुकास्तरीय कार्यकारणीचा विस्तार करणे गरजेचे झाले आहे. शिवाय मागील वर्षी अनेक ओबीसीच्या विद्यार्थ्यांना जातीचे वैधता प्रमाणपत्रा अभावी शिष्यवृती पासुन वंचीत रहावे लागले आहे. यासाठी यंदा दहावी -बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेल्या जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असून सर्वसामान्य नागरीकांना जिवन जगणे कठीण झाले आहे. मात्र सत्ताधारी खोट्या जाहीराती प्रसिद्ध करून जनतेची दिशाभुल करीत आहे. इतकेच नव्हेतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यातील राजकारणाला काळीमा फासत असल्याचा त्यांनी पत्रकार परीषदेत निषेधही व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
कैलास राघो पाटील (पारोळा), विकास साळुंखे (एरंडोल), नरेंद्र पाटील (चोपडा), सिताराम पाटील (पाचोरा), किशोर खोडपे (जामनेर), गजानन वंजारी (भुसावळ), साहेबराव पाटील (मुक्ताईनगर), सुनील कोंडे (रावेर), निवृत्ती धांडे (यावल), मनोज पाटील (बोदवड), अनिल पाटील (धरणगाव), मधुकर पाटील (जळगाव) या तालुकाध्यक्षांसह जिल्हा सरचिटणीस दिगंबर पाटील यांची उपस्थिती होती.