राज्यातील वाईन शॉप्स सुरू करा – राज ठाकरे

0

मुंबई – राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी कोणत्याही नैतिक गुंत्यात न अडकता, महसुलासाठी वाईन शॉप सुरू करा, असा सल्‍ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दिला आहे. दारू पिणार्‍यांसाठी नव्हे तर महसुलाची गरज लक्षात घेत असे निर्णय घ्यायची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील पेट्रोलपंप आज जवळपास बंद आहेत. जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत. दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. यावरून सरकारला होत असलेल्या व होऊ शकणार्‍या महसुली तोट्याचा विचार व्हायला हवा. टाळेबंदी आणखी किती दिवस चालेल याची खात्री नाही. त्यामुळे त्यामुळे कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्याच्या महसुलासाठी सरकारने वाइन शॉप उघडण्याचा विचार करावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. याचबरोबर, मुंबईसारख्या शहरात गरज बनलेल्या हॉटेल, खानावळी व पोळी-भाजी केंद्रांना पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. हॉटेलातील कर्मचार्‍यांचा रोजगार सुरू होईल व राज्याच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात धुगधुगी निर्माण होईल, असेही राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.