राज्यातील सत्तेतून शिवसेना बाहेर पडणार?

0

नवी दिल्ली । राज्यात सत्तेत राहून सरकारविरोधी नेहमीच भूमिका घेणारी शिवसेना राज्यातील सत्तेवर सेना हातोडा मारणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी वांद्रे कुर्ला काँमप्लेक्समध्ये शिवसेनेच्या मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराची सांगता सभा होणार आहे. या सभेतच शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

शिवजयंतीचा मुहूर्त साधणार

मुंबई महापालिकेमध्ये सेनेनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर तर उध्दव ठाकरे यांनी भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. भाजपच्या पारदर्शी कराभाराची खिल्ली उडवताना मंत्रीमंडळाच्या बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांना आणि लोकायुक्तांना बसवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेमध्ये दरी वाढत चालाली आहे. भाजपच्या मांडीला मांडी लावत सत्तेत बसलेली शिवसेना महापालिकेपुरते नाटक करत असल्याची विरोधकांनी केलेली टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे.

रात्री मंत्र्यांची ‘वर्षा’वर भेट

दरम्यान बुधवारी रात्री शिवसेनेचे मंत्री वर्षा बंगल्यावर रात्री उशीरा मुंख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे वृत्त होते. राज्यात सध्या भाजपचे 122 आमदार आहेत तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. सरकारमध्ये शिवसेनेच्या वाटेला दुय्यम मंत्रीपदे आली असल्याची भावना शिवसेनेच्या आमदारांमध्ये असून आहे त्या मंत्रीपदांवरही मुख्यमंत्र्यांचेही लक्ष असते. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनीमध्येही सरकारविषयी खदखद आहे.