मुंबई: राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यसरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील सात दिवस राज्यातील सर्व सरकारी कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेली लोकलसेवा तसेच मुंबईतील बेस्ट बससेवा बंद करण्यात यावी, अशी मागणी होत असून राज्य सरकार त्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत राजधानी, डेक्कन, प्रगती, दुरांतो एक्स्प्रेससह एकूण २३ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. कोरोना संसर्ग टाळणे आणि प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत या गाड्या रद्द राहणार आहेत.