राज्यातील स्वाइन फ्लू मृतांचा आकडा 327 वर

0

पुणे । राज्यभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. पुण्यात 71 रुग्णांचा मृत्यू झाला असून पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये 34, औरंगबादमध्ये 23 तर मुबंईत 15 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा 327 वर पोहचला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले असून राज्य पातळीवर स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

राज्यात पावसाने जोर धरला आहे. पावसाळ्यात स्वाइन फ्लूचे विषाणू अधिक सक्रीय झाले आहेत. परिणामी स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत राज्यात 18 लाख 72 हजार रुग्णांचे स्क्रीनिंग केले असून त्यापैकी 3 हजार 15 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी 327 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीतील 29, पिंपरी चिंचवड 20 तर पुणे ग्रामीणमधील 22 रुग्णांचा समावेश आहे. तसेच स्वाइन फ्लू मुळे अमरावतीमध्ये 13, अकोला 10, नगर व ठाण्यात प्रत्येकी 20 कोल्हापूर व सातार्‍यात 9 रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे, अशी माहिती साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. मुकूंद डिग्गीकर यांनी दिली. त्यामुळे ताप, सर्दी, खसा दुखत असल्यास नागरीकांनी त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत, असे अवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.