राज्यातील २६ पंतप्रधान सिंचन प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करणार

0

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती

मुंबई :-राज्यातील जलगतीने होणाऱ्या पूर्ण २६ प्रकल्पांचा पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेत समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून डिसेंबर २०१९ ही हे प्रकल्प पूर्ण करून कार्यान्वित केले जाणार आहे. अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली.

कोल्हापूर जिल्हयातील प्रकल्पांची कामे अपूर्णावस्थेत असल्याबद्दल विधानसभा सदस्य संध्यादेवी देसाई-कुपेकर, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरूडकर आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले कृष्णा खोरे विकास महामंडळाने धामणी धरणाच्या कामासाठी यांत्रिकी विभागाने मान्यता दिली होती. परंतु दोन वर्ष प्रयत्न केल्यानंतर ही कामे यांत्रिकी विभागाकडून करता येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे या कामाच्या निविदा लवकरात लवकर काढून कामे केली जातील. पावसाळयापूर्वी या कामांचे उद्घाटन केले जाईल. तसेच राज्यपालांनी ठरवून दिलेल्या सुत्रानुसार पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेत २६ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात असून कोणत्याही परिस्थितीत ही कामे डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करून कार्यान्वित केले जातील.